न्यू यॉर्कमध्ये एका मंदिराची १० दिवसांपूर्वी विटंबना करण्यातआली होती. या विरोधात भारतीय दुतावासाने निषेध नोंदवला होता. आता कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची गुरुवारी तोडफोड करण्यात आली. हिंदूंनो परत जा असे हिंदुविरोधी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“न्यू यॉर्कमधील मेलव्हिल येथील स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाल्यानंतर १० दिवसांनी सॅक्रामेंटो कॅलिफोर्निया येथील आमच्या मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. द्वेषपूर्ण संदेशांसह ही तोडफोड करण्यात आली”, अशी माहिती BAPS हिंदू संघटनेने का निवेदनातून दिली. “आमचा निषेध कायम राहील. आमचे दुःख यामुळे आणखीनच वाढले आहे. अंतःकरणात द्वेष असलेल्या प्रत्येकासाठी आमच्या प्रार्थना अधिक दृढ झाल्या आहेत”, असंही निवेदनात म्हटलं आहे.

यूए हाऊसमध्ये सॅक्रामेंटा काऊंटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमी बेरा यांनी या घनटेचा निषेध केला आणि लोकांना असहिष्णतेविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. “#SacramentoCountry मध्ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला जागा नाही. आपल्या समाजातील या उघड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. आपण सर्वांनी असहिष्णूतेच्या विरोधात उभे राहायला हवे आणि आपल्या समाजातील प्रत्येकाला सुरक्षित आणि आदरणीय वाटेल याची खात्री केली पाहिजे”, असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> Import Duty : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘A very big abuser’ असा का केला?

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सिनेट न्यायिक समितीला पत्र लिहून एफबीआय आणि कॅलिफोर्निया या दोन्ही राज्यांच्या डेटाचा हवाला देऊन हिंदूंविरोधी द्वेषाचा इतिहास आणि विशेषतः हिंदू प्रार्थनास्थळांबाबत चिंताजनक वाढ यावर तपशीवार अहवाल दिला आहे.