खलिस्तानी चळवळीचा समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कॅनडानं भारताता या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमवीर कॅनडामधील वातावरण बिघडत असून तेथील हिंदू समुदाय दहशतीच्या छायेखाली असल्याचा गंभीर दावा कॅनडाच्या संसदेतील हिंदू खासदार चंद्रा आर्या यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यासोबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

“कॅनडातील हिंदूंना मी आवाहन करतो की…”

चंद्रा आर्य यांनी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून कॅनडातील हिंदूंना आवाहन केलं आहे. “काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तानी चळवळीचा नेता व सीख फॉर जस्टिसचा अध्यक्ष गुरपतवंत सिंग पन्नू यानं कॅनडातील हिंदूंवर हल्लाबोल करत आम्हाला कॅनडातून भारतात निघून जायला सांगितलं. यानंतर अनेक हिंदू कॅनेडियन नागरिक दहशतीच्या छायेखाली असल्याचं मी ऐकलं आहे. माझं कॅनडातील हिंदू नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी शांत पण सतर्क राहावं. अशा प्रकारच्या हिंदूफोबियाचा कोणताही प्रकार तुम्हाला दिसल्यास तातडीने स्थानिक सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती द्या. खलिस्तानी चळवळीचे नेते इथल्या हिंदू नागरिकांना भडकवून देशात हिंदू व शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
hindu temple attacked in canada
कॅनडात हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; पंतप्रधान ट्रुडोंचा निषेध!
Allegations against Amit Shah baseless The Ministry of Foreign Affairs informed the High Commission of Canada
‘अमित शहांवरील आरोप निराधार’; परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला सुनावले
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
constitution of india loksatta article
संविधानभान : अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधित्व
Rajasthan Govt Book Controversy
Godhra : गोध्रा प्रकरणात हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेलं पुस्तक राजस्थान सरकारने घेतलं मागे, मंत्री मदन दिलावर म्हणाले, “काँग्रेस..”

“कॅनडातील शिखांचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नाही”

दरम्यान, शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. “मी स्पष्टच सांगतो. कॅनडातील बहुतांश शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नाही. अनेक शीख नागरिक काही कारणास्तव जाहीरपणे खलिस्तानी चळवळीचा निषेध करू शकत नाहीत. पण त्यांचे कॅनडातील हिंदू नागरिकांशी चांगले संबंध आहेत. हे संबंध कौटुंबिकही आहेत, सामाजिक-सांस्कृतिकही आहेत”, असं ते म्हणाले.

India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गुन्हेगारीचं उदात्तीकरण”

“कॅनडामध्ये नैतिक मूल्यांना महत्त्वाचं स्थान आहे. आपण कायद्याला सर्वोच्च महत्त्व देतो. मला हे कळत नाहीये की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवाद किंवा द्वेषमूलक गुन्ह्यांचं उदात्तीकरण कसं केलं जाऊ शकतं? जर कॅनडातील हिंदू समुदाय या भडकवण्याला बळी पडला, तर कॅनडामध्ये गंभीर परिस्थिती ओढवेल. पण खलिस्तानी नेते हिंदूंना भडकवणं सोडणार नाहीत असंच दिसतंय. कॅनडातील हिंदू नागरिक शांत राहतात आणि त्यांनाच सहज लक्ष्य करता येईल अशी खलिस्तानींची धारणा आहे”, असा दावा खासदार चंद्रा आर्य यांनी केला आहे.

“हिंदू नागरिकांनी मिळवलेलं यश हिंदूविरोधी समाजघटकांना सहन होत नाहीये. असे दोन गट सुनियोजितपणे कॅनडातील हिंदूंवर हल्ले करत आहेत. माझ्यावरही हल्ले झाले. गेल्या १० महिन्यांपासून कॅनडाच्या ध्वजासह आपलं ओम चिन्ह झळकवल्यामुले मला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. माझी सर्व हिंदू कॅनेडियन नागरिकांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी शांत पण सतर्क राहावं. एक कॅनेडियन नागरिक म्हणून आपल्या हिंदू श्रद्धा, वारसा आणि कॅनडाच्या विकासातील आपलं योगदान याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा”, असं आर्य आपल्या व्हिडीओच्या शेवटी म्हणाले.

भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…”!

काय आहे कॅनडाचा आरोप?

हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडानं केला असून त्यासंदर्भात कॅनेडियन तपास यंत्रणा सविस्तर तपास करत असल्याचं पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितलं आहे. अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून भारतानं तपासात सहकार्य करण्याची भूमिका मांडली आहे.