“आमचे पूर्वजही हिंदूच होते. मात्र, इस्लामच्या विशेष गुणांमुळे हिंदूंनी हा धर्म स्वीकारला असल्याचे खळबळजनक विधान AIUDF चे सर्वेसर्वा आणि आसाम राज्य जमीयत उलामाचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. आपण इतर धर्मीयांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. भारत हा विविध समुदाय, वांशिक गट आणि धर्माच्या लोकांचा देश असल्याचे अजमल म्हणाले.
हेही वाचा- डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक लेह-लडाखमधील ‘कांगयात्से’ शिखरावर
आरएसएस वर आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) काही लोक हिंदु राष्ट्र बनवण्याच्या विचाराने भारत संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बद्रुद्दीन अजमल यांनी केला आहे. ते या देशातील मुस्लिम आणि हिंदूंमधील ऐक्य कधीच तोडू शकत नाहीत. देशात बहुसंख्य सनातन धर्म आहे. त्यामुळे इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांनी ईदच्या दिवशी गायींचा बळी देऊन सनातन धर्मियांच्या भावना दुखवू नये. ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी गायीचा बळी देणं अनिवार्य नाही. देशातील बहुतांशी आपले बांधव हे सनातन किंवा हिंदू धर्मातील आहेत. ते गायीला आपल्या मातेसमान मानतात, त्यामुळे मुस्लिमांनी गायींचा बळी कशासाठी द्यायचा? ईदीला मुस्लिमांनी गायींचा बळी देऊ नये,” असं आवाहन बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.
नुपूर शर्मासारख्या लोकांना देवाने मेंदू द्यावा
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावरील टिप्पणीबाबत बोलताना बदरुद्दीन म्हणाले की, मुस्लिमांनी त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. त्याऐवजी नुपूर शर्मासारख्या लोकांना देवाने मेंदू द्यावा, अशी प्रार्थना त्यांनी करावी. शिरच्छेद करण्यासारखे वक्तव्य मुर्खपणाचे लक्षण असल्याचेही बद्रुद्दीन अजमल म्हणाले.