ख्रिसमस उत्सवाच्या कार्यक्रमातून ख्रिश्चन धर्माकडे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांनी रोहतकच्या शिव पंजाबी धर्मशाळेत ख्रिसमस उत्सवाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला. या कार्यक्रमात कुस्तीपटू खली प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होता. दि प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. या कार्यक्रमामागील छुपा अजेंडा ख्रिश्चन धर्माकडे लोकांना आकर्षित करण्याचा आहे, असा दावाही यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी मंचावर हनुमान चालिसाचे पठण सुरू केले आणि उपस्थितांना बाहेर जाण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र आयोजकांना त्यांची सजावट आणि भोजनाची व्यवस्था सोडून कार्यक्रमस्थळ सोडावे लागले.
उपचार आणि आर्थिक लाभाचं आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न
शिव धर्मशाळेत ख्रिसमस साजरा केला जात नव्हता. तिथे लोकांना उपचार आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले जात होते. प्रत्येकाला त्यांच्या श्रद्धेशी निगडित सण साजरे करण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी सार्वजनिक जागा वापरल्या जाऊ नयेत. जर त्यांना असे कार्यक्रम करायचे असतील तर त्यांनी ते त्यांच्या चर्चमध्ये करावेत, शिव धर्मशाळेत नाही”, असं विहिंपचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या सनी हिंदू यांनी सांगितलं.
कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर आजारातून बरे होतील, अशा भूलथापा महिलांसमोर मांडल्याचा दावा सुषमा सनातनी या महिला कार्यकर्तीने केला. आर्थिक प्रोत्साहनांच्या आश्वासनांसह लोकांचे धर्मांतर करून त्यांच्या समुदायाचा आकार वाढवण्याचा हेतू आहे, असाही आरोप करण्यात आला.
धर्मशाळेचे अध्यक्ष काय म्हणाले?
शिव पंजाबी धर्मशाळेचे अध्यक्ष मनमोहन आझाद यांनी दि प्रिंटला सांगितले की, “कार्यक्रमाचे आयोजक प्रेषित परवीन सिंग यांनी आवश्यक पैसे देऊन जागा आगाऊ बुक केली होती. ख्रिसमस साजरा करण्यासाठी रोहतक आणि दूरच्या ठिकाणांहून अनेक सहभागी आले होते. मात्र, अचानक विहिंप आणि बजरंग दलाचे सदस्य तेथे आले आणि त्यांनी गोंधळ घातला. पोलिसही नंतर पोहोचले, परंतु ते हल्लेखोरांसोबतच असल्याचे दिसत होते. भगवान शिवाचे नाव असलेली धर्मशाळा मी दुसऱ्या धर्माच्या लोकांना का भाड्याने दिली, अशी विचारणा करत हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य माझ्याशी वाद घालू लागले.”
धर्मशाळेतील कामगारांनी हस्तक्षेप केला नसता तर त्यांनी आपल्यावर हल्ला केला असता असा आरोप आझाद यांनी केला. आपल्यावर हल्ला होत असताना पोलीस मूक प्रेक्षक राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या आयोजकांची भूमिका काय?
आयोजक प्रेषित परवीन सिंग यांनी द प्रिंटला सांगितले की, या कार्यक्रमाचे अगोदरच नियोजन झाले होते. त्याकरता रोहतकमधील सर्व प्रमुख ठिकाणी पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले होते.
E
“आमच्या लोकांनी कार्यक्रमासाठी खूप तयारी केली होती. आम्ही रात्रीच्या जेवणाची आणि दिवसभर फराळाची व्यवस्था केली होती. पण त्यांनी आमच्या लोकांना त्रास दिला. त्यांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले”, असा सिंग यांनी आरोप केला.
ते म्हणाले की खली आधीच रोहतकमध्ये पोहोचला होता आणि नंतर त्याला चर्चमध्ये नेण्यात आले, जिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, परंतु हिंदुत्ववादी गटांचे लोक तेथे पोहोचले आणि त्यांना हा कार्यक्रम लवकरच संपवण्याची धमकी दिली.