* तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जींचे मत
पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मिश्रा यांना धक्काबुक्कीमागे काँग्रेसचाही हात असल्याची शंका नाकारता येणार नसल्याचे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीतील नियोजन आयोगासमोर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीवेळी सुब्रतो मुखर्जीही तेथे उपस्थित होते. ते म्हणाले की, ” ममता बॅनर्जी आणि अमित मिश्रा यांना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमागे काँग्रेसचाही हात आहे की नाही, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. परंतु, याबद्दलचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत.” तसेच “फक्त २० ते २२ एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अडवणेही दिल्ली पोलिसांना कसे शक्य झाले नाही?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Story img Loader