गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला (बंधारा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. हा बंधारा ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’च्या उभारण्यात येत आहे. राजकोट-कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून यासाठी १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
बुधवारी स्थानिक आमदार आमदार दर्शिता शाह आणि राजकोटचे महापौर प्रदीप देव यांच्या उपस्थितीत या बंधाऱ्याचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला आदरांजली म्हणून या बंधाऱ्याचं नामकरण ‘हिराबा स्मृती सरोवर’ असं करण्यात आलं आहे. यामुळे इतरही लोकांनाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दान करण्याठी प्रेरणा मिळेल, हा यामगचा हेतू होता, अशी माहिती ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’चे अध्यक्ष दिलीप सखिया यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं ३० डिसेंबर रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधम झालं. अहमदाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे हिराबेन मोदी यांच्या स्मरणार्थ राजकोट येथील बंधाऱ्याला ‘हिराबा स्मृती सरोवर’ नाव देण्याचा निर्णय ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’ने घेतला.
विशेष म्हणजे या ट्रस्टने देणगीदारांनी केलेल्या आर्थिक मदतीतून गेल्या चार महिन्यांत सुमारे ७५ छोटे बंधारे बांधले आहेत. या नवीन बंधाऱ्याचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची त्याची क्षमता असेल. यात एकदा पाणी साठले की ते नऊ महिने ते आटणार नाही. यामुळे भूजल साठा वाढण्यास मदत होईल व परिसरातील गावातील शेतकरी व पशुपालकांना त्याचा लाभ होईल.