भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे नेपाळ आणि काठमांडू शहरात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या दोन्ही शहरांतील अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये असणारा ‘धरहारा’ हा ऐतिहासिक टॉवर भूंकपाच्या धक्क्याने कोसळला आहे. हा टॉवर बघण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे टॉवर कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली ४०० जण अडकल्याची भीती आहे. याठिकाणी तब्बल अर्धा तास भुकंपानंतरचे ‘आफ्टरशॉक्स’ धक्के बसत असल्याचीही माहिती मिळत आहे.
भूकंपामुळे काठमांडू शहरातील ऐतिहासिक धरहारा (भीमसेन) टॉवर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हा टॉवर ९ मजली असून, १९ व्या शतकात तो बांधण्यात आला होता. नेपाळमधील कुतुबमिनार अशी याची ओळख होती. पर्यटकांची येथे खूप गर्दी असते.

Story img Loader