जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले.

हत्या

१४ एप्रिल १८६५ : अमेरिकेच्या गृहयुद्धाच्या काळात अध्यक्षपदी असलेल्या अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली. वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स नाट्यगृहात ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे विनोदी नाटक पाहण्यास लिंकन पत्नीसह गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूस बसलेल्या जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी सकाळी लिंकन यांचा मृत्यू. १२ दिवसांनी पोलिसांकडून बूथ ठार.

Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
Karnataka
Karnataka : संगणक ऑपरेटरची एक चूक अन् जिवंत व्यक्तीला दाखवलं मृत; मदतीसाठी व्यक्तीची आयएएस अधिकाऱ्यांकडे धाव; नेमकं काय घडलं?
Murder of young journalist Mukesh Chandrakar
सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा जीव…
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
husband dies by suicide
‘तिला धडा शिकवा’, अतुल सुभाष प्रकरणाप्रमाणे व्हिडीओ बनवून पतीची आत्महत्या; पत्नीवर केले गंभीर आरोप
Image of a well
पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू

●२ जुलै १८८१ : न्यू इंग्लंडला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी वॉशिंग्टनमधील रेल्वे स्थानकातून जात असताना राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांच्यावर चार्ल्स गुइटो नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेले गारफिल्ड यांचा अडीच महिन्यांनंतर मृत्यू. या प्रकरणात दोषी आढळलेल्या गुइटोला फाशीची शिक्षा.

हेही वाचा >>> डोनाल्ड ट्रम्प हल्ल्यातून बचावले

६ सप्टेंबर १९०१ : न्यू यॉर्कमध्ये बफेलो येथे भाषण केल्यानंतर जमलेल्या नागरिकांशी हात मिळवत असताना राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली यांच्यावर गोळीबार. गोळ्यांच्या जखमांमुळे गँगरीन होऊन मॅककिन्ली यांचा मृत्यू.

लिओन क्झोल्गोझ नावाच्या बेरोजगार तरुणाकडून हत्येची कबुली. विजेच्या खुर्चीत बसवून त्यांना मृत्युदंड.

२२ नोव्हेंबर १९६३ : जॉन एफ. केनेडी या तरुण राष्ट्राध्यक्षांची १९६३ मध्ये डॅलस शहरात हत्या. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला. ली हार्वे ओस्वाल्ड या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. मात्र खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच जॅक रूबी नावाच्या हल्लेखोराकडून गोळ्या झाडून ओस्वाल्डची हत्या.

४ जून १९६८ : जॉन एफ. केनेडी यांचे धाकटे बंधू रॉबर्ट एफ. केनेडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार. पक्षाचा प्रचार सुरू असतानाच त्यांची हत्या.

हत्येचा प्रयत्न

५ सप्टेंबर १९७५ : राष्ट्राध्यक्ष जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड हे सॅक्रामेंटो येथे कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या बैठकीला जात असताना लिनेट ‘स्क्विकी’ फ्रॉम या महिलेने गर्दीत धक्कबुक्की करत पिस्तूल बाहेर काढले आणि फोर्ड यांच्याकडे बोट दाखवून इशारा केला. गोळीबार झाला नसला तरी या प्रकरणात फ्रॉमला तुरुंगवासाची शिक्षा.

२२ सप्टेेंबर १९७५ : सॅन फ्रान्सिस्कोमधील एका हॉटेलबाहेर सारा मूर या महिलेने जेराल्ड फोर्ड यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र ती चुकली. दुसरी गोळी झाडण्याआधीच तिला ताब्यात घेऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

३० मार्च १९८१ : वॉशिंग्टन डी. सी. येथे भाषण संपल्यानंतर ताफ्याकडे जात असताना गर्दीत असलेल्या जॉन हिंकले कनिष्ठ या व्यक्तीकडून राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळीबार. त्यात रेगन बचावले.

२००५ : जॉर्जियाचे अध्यक्ष मिखाइल साकाशविली यांच्यासमवेत तिबिलिसी येथे एका सभेत जॉर्ज डब्ल्यू बुश सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांच्यावर हातबॉम्ब फेकण्यात आला. यात कोणीही जखमी झाले नाही.

Story img Loader