First Case of HMPV Virus in India : HMPV या व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला HMPV या व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. बंगळुरुतल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

भारतात आढळला पहिला रुग्ण

आत्तापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते. मात्र बंगळुरुतल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसने ग्रासलं आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तसंच चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती. दरम्यान आता भारतात आठ महिन्यांच्या बाळाच्या रुपाने HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

Prashant Kishor Arrested BPSC Protest
Prashant Kishor Arrested : बेमुदत उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक, पाटणा पोलिसांची कारवाई, नेमकं काय घडलं?
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
CAG report on expenditure incurred by Arvind Kejriwal on CM residence
नूतनीकरणाची किंमत ३३ कोटी! केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थानावर केलेल्या खर्चासंबंधी ‘कॅग’चा अहवाल
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
HMPV virus
HMPV Virus India : “HMVP हा नवीन विषाणू नाही…”, महत्त्वाची माहिती देत केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे नागरिकांना आवाहन
us action on 19 Indian companies
१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत आरोप

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, ‘एचएमपीव्ही’साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.

हे पण वाचा- चीनमध्ये पसरत असलेल्या HMPV विषाणूचा भारताला धोका आहे का? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषणूचा वाढता प्रभाव पाहाता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत.

Story img Loader