HMPV Virus India: करोनाच्या विषाणूला यशस्वीरीत्या पराभूत करण्यात जगाला यश आलं असलं, तरी आता पुन्हा एकदा चीनमधूनच आलेल्या एका नव्या विषाणूने जगभरातल्या शासनकर्त्यांची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये HMPV नावाच्या एका नव्या विषाणूचा फैलाव होऊ लागला असून मोठ्या प्रमाणावर या विषाणूची लागण चीनमध्ये नागरिकांना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आत्तापर्यंत या विषाणूचा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळला नसल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, हा विषाणू करोनाइतका जीवघेणा नसल्याचं आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगत आहेत.

काय आहे हा विषाणू?

चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लागण होऊ लागली आहे. यामुळे जाणवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्या उपचारांसाठी चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. करोनाच्या साधीमधून नुकतंच अवघं जग बाहेर पडलेलं असल्यामुळे नव्या विषाणूचा प्रसार सुरू होताच सर्वच देशांमध्ये नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
metapneumovirus in china
करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार; ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे? याचा भारताला धोका किती?
Torres scam
दागिने बनविणाऱ्या ‘टोरेस’च्या कार्यालयांबाहेर गर्दीमुळे तणाव; विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
Two patients in Nagpur diagnosed with HMPV
धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ?

यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA चे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी या नव्या विषाणूबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

HMPV विषाणू जगाला नवीन नाही!

“करोनाची महामारी जगभरात पसरली होती. लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते. कोट्यवधी लोक बाधित झाले होते. त्याचप्रमाणे २०२५ च्या सुरुवातीला चीनमधून HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस नावाचा एक विषाणू पसरला आहे. पण हा विषाणू नवीन नाही. या विषाणूची साथ काही काळापूर्वी अमेरिका, कॅनडा व अन्य देशांतही आली होती”, असं डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.

HMPV: करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार; ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे? याचा भारताला धोका किती?

काय आहेत HMPV विषाणूची लक्षणं?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्हिडीओमध्ये HMPV विषाणूची लागण झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांचा उल्लेख केला आहे. “हा कोविडसारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही. त्याची तीव्रता कोविडपेक्षा कमी आहे. त्याचा मृत्यूदरही कमी आहे. करोना विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे. न्यूमोव्हिरीडी नावाच्या गटातला हा विषाणू आहे. याची बाधा झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं अशी लक्षणं दिसतात. याची तीव्रता वाढत गेली, तर न्यूमोनिया होण्याचीही लक्षणं दिसून येतात. यातही ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. पण हा तितका धोकादायक नाही”, असं डॉ. भोंडवे यांनी नमूद केलं आहे.

“साधारण ५ ते १० दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती व इतर काही औषधं घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते. या विषाणूवर अजूनही कोणतंही औषध नाही. पण हा विषाणू आपल्याला आधीपासूनच माहिती असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस लवकर येईल. त्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही. याचे प्रतिबंधात्मक उपाय करोनासारखेच आहेत. उदा. मास्क घालणं, गर्दीत न जाणं, इतरांपासून अंतर ठेवणं, साबण-पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे. हा करोनाइतका धोकादायक नसला, तरी आपण सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे”, असंही डॉ. अविनाश भोंडवे यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader