पॅसिफिक महासागराच्या तळाशी ९६५ किमी लांबीच्या फॉल्ट लाइनमध्ये एक छिद्र आढळलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीवर ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. ‘पायथियास ओएसिस’ नावाच्या छिद्रातून ४ किमी खाली अडकलेला द्रव समुद्रात सोडला जात आहे. हा द्रवपदार्थ टेक्टोनिक प्लेट्समध्ये लुब्रिकंट म्हणून काम करतो.
हे छित्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकतं अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या तीव्र भूकंपामुळे अमेरिकेच्या वायव्येकडील शहरं नष्ट होतील. उष्ण द्रव पदार्ध बाहेर पडत असलेलं छिद्र ओरेगॉनच्या किनार्यापासून ५० मैल अंतरावर आहे, जे कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणून ओळखलं जातं. या छित्रामुळे तब्बल ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंक येऊ शकतो, अशी भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा >> भाजपाकडून तुम्हाला ऑफर आहे का? खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” पंतप्रधान मोदींनी लोकसभेत…”
या छिद्रातून द्रव पदार्थ बाहेर पडण्याचं दृष्य सर्वात आधी २०१५ मध्ये पाहायला मिळालं होतं. या द्रव पदार्थामुळे प्लेट्सला सहज हलवता येतं, परंतु याशिवाय “दाब निर्माण होऊन विनाशकारी भूकंप होऊ शकतो.” हे छिद्र कॅस्केडिया सबडक्शन झोनच्या सीमेवर आहे आणि रासायनिकदृष्ट्या वेगळे द्रव सोडते. दरम्यान, संशोधकांनी जाहीर केलेल्या पेपर्समध्ये अहवाल दिला आहे की, “ऑरेगॉनच्या किनार्यापासून ३,२८० फूट खाली समुद्रसपाटीपासून खाऱ्या, उच्च-तापमानाचे, खनिज-समृद्ध पाण्याचे गिझर शोधणं आता अर्थहीन वाटतं.