हॉलीवूड अभिनेते, विनोदवीर आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले. विल्यम्स यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी रात्री विल्यम्स यांचा मृतदेह कॅलिफोर्नियातील राहत्या घरी आढळला. त्यांनी तणावाखाली आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असले तरी अजूनही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळलेले नाही. मागील काही काळापासून विल्यम्स हे मादक पदार्थ आणि दारुच्या व्यसनाधीन झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते एका सुधारगृहातून परतले होते आणि व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. रॉबिन विल्यम्स यांच्या मृत्यूमुळे त्यांची पत्नी सुझान श्नायडर यांना मोठा धक्का बसला आहे.
गुड विल हंटींग, नाईट अ‍ॅट म्यूझियम – दि सिक्रेट ऑफ टॉम्ब, जूमांजी, डेड पोएट सोसायटी या चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. गुड विल हन्टिंग’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहय्यक अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा