पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात असे हे सत्य आहे असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखत दिली. पंतप्रधान मोदींना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती, तिला पंतप्रधान मोदींनी उभे केले असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
राजकारण नेते धोका पत्करणे नाकारातत कारण त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात असे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारले. त्यावर अमित शाह यांनी भाष्य केले आहे. “मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करुन निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकार चावण्यासाठी सरकारमध्ये नाही आलो. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक जागी पोहोचवाचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांविषयी विचारले असता शाहा म्हणाले, “त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागात विभागले जाऊ शकते. एक, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर. त्याचे सार्वजनिक जीवन या तीन भागांमध्ये विभागले जाऊ शकते.”
“जेव्हा त्यांना भाजपामध्ये पाठवण्यात आले, तेव्हा त्यांना संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती आणि देशात पक्षाच्या दोन जागा होत्या. त्यानंतर ते संघटना मंत्री झाले आणि १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. पहिल्यांदाच भाजपा स्वबळावर महापालिकेत सत्तेवर आला. त्यानंतर भाजपाचा प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. त्यानंतर १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपाने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.