गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या वक्तव्यावर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आता त्यांच्या स्पष्टीकरण दिले आहे. अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काही चुकीचे बोलले असे मी म्हटले नाही. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. तो त्यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोलले नाहीत, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्यपाल मलिक यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर विरोधकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही लोक पंतप्रधान मोदींची दिशाभूल करतात. एक दिवस त्यांना समजेल, असे आपण व्हिडीओमध्ये म्हटल्याचे सत्यपाल मलिक यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले आहे.

‘जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो तेव्हा त्यांची वृत्ती खूप हट्टी होती. ते म्हणाले की, तुम्ही अमित शाहांना भेटा. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. मी अमित शाह यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की काही लोकांनी त्यांची दिशाभूल केली आहे आणि एक दिवस त्यांना नक्कीच समजेल, असे सत्यपाल मलिक म्हणाले. मलिक यांच्या या वक्तव्यामुळे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध बिघडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबतह सत्यपाल मलिक म्हणाले की, दोघांमधील संबंध खूप चांगले आहेत. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने उशीर केला असला तरी तो योग्यच निर्णय घेतला आहे. तरीही हा निर्णय आधी घेतला असता तर बरे झाले असते, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले असते, असे सत्यपाल मलिक म्हणाले.

ते ५०० शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; मोदींनी संतापून प्रतिप्रश्न विचारल्याचा राज्यपालांचा दावा

दरम्यान, याआधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा गर्विष्ठ स्वभावात होते. पंतप्रधानांशीही त्यांचा वाद झाल्याचे मलिक यांनी म्हटले होते. “जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, आपले ५०० लोक मेले आहेत, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मेले आहेत का?, असा प्रतिप्रश्न मला विचारला. मी म्हणालो की, हो तुमच्यासाठीच मेलेत कारण तुम्ही राजे झाला आहात ना. यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले,” असे मलिक म्हणाले. पंतप्रधान म्हणाले आता तुम्ही अमित शहांना भेटा. त्यानंतर मी अमित शहा यांची भेट घेतली, असे मलिक पुढे म्हणाले.

या विधानानंतर चर्चा सुरु झाल्यानंतर प्रश्नावर सत्यपाल मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या स्वरात हे कायदे मागे घेतले त्यामुळे त्यांची समाजात सद्भावना वाढली आहे.’ कृषी कायदे रद्द झाल्यानंतरच्या परिस्थितीवर सत्यपाल मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे. लोकांचा भाजपाबद्दलचा दृष्टिकोनही मवाळ झाला आहे. जे काही झाले ते खूप चांगले झाले आहे,” असे मलिक यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah meant no disrespect to pm narendra modi meghalaya governor satya pal malik abn