नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राजकीय वादात अडकले. काँग्रेसने शहांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला व संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रणकंदन माजले. संध्याकाळी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस व नेहरू-गांधी घराण्यांवर सडकून टीका केली.

शहा यांनी मंगळवारी केलेल्या विधानामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी बुधवारी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे सभागृहे आधी दुपारी दोन वाजेपर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब करावी लागली. काँग्रेस आक्रमक होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने शहांची पाठराखण केली. भाजपचे अन्य नेतेही शहांना पाठिंबा देण्यासाठी सरसावले. राज्यसभेतील शहांच्या संबंधित विधानाची १०-१२ सेकंदाची चित्रफीत काँग्रेसने समाजमाध्यमावरून व्हायरल केल्याचा आरोप (पान ९ वर) (पान १ वरून) भाजपने केला. ‘माझ्या विधानांची तोडमोड करून काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे’, असा आरोप शहांनी केला. मात्र, ‘शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहांचा राजीनामा घेतला नाही तर देशभर तीव्र आंदोलन केले जाईल’, असा इशारा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

हेही वाचा : महाराष्ट्रात NHAI चं २०३ कोटींचं नुकसान; CAG चा अहवाल लोकसभेत सादर, रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका!

स्थगन प्रस्ताव, शिस्तभंग नोटीस

संसदेच्या आवारातील प्रमुख मकरद्वारासमोर बुधवारी सकाळी खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेते व खासदारांनी डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे हातात घेऊन शहांविरोधात निदर्शने केली व माफीनाम्याची मागणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्येही काँग्रेसने शहांनी केलेल्या आंबेडकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी, शहांचे विधान आक्षेपार्ह नसल्याचा दावा करत आंबेडकर देशातील सर्वांसाठी पूजनीय असल्याचे सांगितले. काँग्रेसने लोकसभेत याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली, तर राज्यसभेत तृणमूल काँग्रेसने शहांविरोधात शिस्तभंगाची नोटीस दिली.

देशभरात शहांविरोधी निदर्शने

शहांच्या विधानावरून काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्ली, हरियाणा, राजस्थान व अन्य राज्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी आंदोलन केले. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही मोदी-शहांविरोधात टीका केली. शहांवर ‘इंडिया’ आघाडीने थेट शाब्दिक हल्लाबोल केल्यामुळे भाजपनेही तीव्र प्रत्युत्तर दिले. भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा, भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय व इतर नेत्यांनी आंबेडकरांच्या छायाचित्रासमोर शहा नमस्कार करत असल्याचे छायाचित्र ‘एक्स’वर प्रसृत केले. काँग्रेस नेहमीच आंबेडकरविरोधी असल्याचा दावा करत गांधी कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रेही ‘एक्स’वर टाकली.

हेही वाचा : One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग

हेच ते वादग्रस्त वक्तव्य

‘‘अलीकडे आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर असा नारा देण्याची फॅशन झाली आहे. तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता. आंबेडकरांचे नाव घेत आहात याचा आनंद आहे. तुम्ही आंबेडकरांचे नाव आणखी १०० वेळा घ्या, पण तुमच्या आंबेडकरांबद्दल काय भावना होत्या हे मला सांगायचे आहे.’’

पंतप्रधानांचे लागोपाठ सहा ‘ट्वीट’

एकीकडे विरोधक शहा यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असताना पंतप्रधान मोदी त्यांची पाठराखण करण्यासाठी सरसावले. काँग्रेस आणि त्यांच्या बुरसटलेल्या ‘इकोसिस्टिम’ला खोटे बोलून स्वत:ची कुकर्मे लपवता येतील हा गैरसमज असल्याची टीका मोदी यांनी ‘एक्स’वरून केली. एकापाठोपाठ एक सहा ट्वीट करून पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य केले. अनुसूचित जाती-जमातींना अपमानित करण्याची वाईट खेळी काँग्रेस खेळत राहिला. या गोष्टी देशातील जनतेने पाहिल्या आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

Story img Loader