ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून झेड प्लस सिक्युरीटी घेण्याची केली गेलेली विनंती धुडकावली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ओवेसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी राज्यसभेमध्ये निवेदन केलं होतं. यावेळी अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमध्ये ओवेसींवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलाताना केंद्राकडून देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षेचा ओवसींनी स्वीकार करावा, अशी विनंती केली होती. परंतु, गृहमंत्री अमित शाह यांच्या विनंतीनंतरही, ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

“आज संसदेत, गृहमंत्री अमित शाह यांनी मला झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास सांगितले. मला त्यांना सांगायचे आहे की, सीएए विरोधातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या २२ जणांपेक्षा माझ्या आयुष्याचे मूल्य जास्त नाही. मला माझ्या सभोवताली शस्त्र हाती घेतलेली लोक आवडत नाहीत. मी एक मुक्त पक्षी आहे, मुक्तपणे जगायचे आहे.” असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आजच स्पष्ट केलं आहे.

असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देखील तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, ओवेसींनी ही सुरक्षा तेव्हा देखील नाकारली होती.

“मी विनंती करतो की, ओवैसींनी तात्काळ Z दर्जाची सुरक्षा घ्यावी आणि…”; अमित शाहांची विनंती

“१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”. असं ओवेसी म्हणाले होते.