देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) मुख्यालयातील लिफ्टमध्ये अडकून बसण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर, अगदी फिल्मीस्टाईलने राजनाथ यांना अडकलेल्या लिफ्टमधून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली. लिफ्टच्या छतातून राजनाथ यांना बाहेर काढण्यात आले.
दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयात शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राजनाथ सिंह यांच्यासोबत त्यांचे ओएसडी बीके सिंह, गृहराज्यमंत्री आणि सीआरपीएफचे प्रमुख प्रकाश मिश्रा एका लिफ्टमधून मुख्यालयात जात होते. या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना कार्यक्रमस्थळी घेऊन जाणारी लिफ्ट मध्येच बंद पडली आणि मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांची भंबेरी उडाली. काय करावे कुणालाच काही सुचेना, अखेर राजनाथ सिंह यांचे ओएसडी बीके सिंह लिफ्टच्या छतावरून बाहेर पडले, त्यानंतर राजनाथ सिंह यांच्यासह इतर मंत्री देखील त्याच पद्धतीने लिफ्टच्या बाहेर आले.
एवढेच नाही तर, झालेल्या घटनेची माहिती खुद्द राजनाथ सिंह यांनीच सीआरपीएफ शौर्य दिनाच्या कार्यक्रमात दिली. स्वतः राजनाथ सिंह यांनी आपण काहीवेळापूर्वी लिफ्टमध्ये अडकल्याची घटना सांगून प्रसंगावधानाने कसे सर्वात आधी आपल्या सोबतच्या सर्वांना लिफ्टबाहेर पडण्यासाठी आपण मदत केली आणि स्वतः सर्वात शेवटी बाहेर पडलो, याचे उदाहरण उपस्थितांना देऊ केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा