पद्म पुरस्कार देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी गृहमंत्रालयाने त्याबाबतच्या अर्जाची पद्धत अधिक सुटसुटीत करणारे निकष जारी केले आहेत. अर्जदाराच्या मूळ माहितीसह आता त्याचे किंवा तिचे आवडीचे क्षेत्र म्हणजेच कला, खेळ, सामाजिक कार्य या बाबतची माहितीही अर्जदाराला सादर करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविले असल्यास त्याचाही उल्लेख अर्जात करावा लागणार आहे.
अर्जदाराकडून अपेक्षित असलेली माहिती दोन पानांपेक्षा अथवा ८०० शब्दांहून अधिक नसावी. नव्या स्वरूपातील भरलेला अर्ज आणि मिळालेले पदक याची सॉफ्ट कॉपी ई-मेलद्वारे तर हार्ड कॉपी टपालाने केंद्रीय गृह सचिवांना पाठवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यापैकी ज्या पुरस्कारासाठी ज्या क्षेत्रासाठी नावाची शिफारस करण्यात आली आहे, त्याचा उल्लेखही स्पष्टपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अन्य संबंधितांची उच्चस्तरीय समिती पद्म पुरस्कारांसाठी नावांची यादी तयार करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा