लैंगिक संबंध आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संस्थेतील गुप्त माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेराला दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे. शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या फोनमधून व्हॉट्सअप चॅट आणि आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओडिशा पोलीस दलाचे पोलीस महासंचालक हिमांसू कुमार लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “57 वर्षीय अधिकाऱ्याची बालासोर जिल्ह्यातील चंदीपूर येथील चाचणी केंद्रावर नियुक्ती झाली होती. त्याने पाकिस्तानी गुप्तहेराला काही संवेदनशील गुप्त माहिती दिली. चंदीपूर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.”

आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता आणि गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीने नेमकी कोणती माहिती पुरवली आहे याबाबत माहिती स्पष्ट होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : VIDEO: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताने पाकिस्तानला सुनावले; म्हणाले, “स्वतः दहशतवादाला…”

दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये याच चंदीपूर चाचणी केंद्रावरून पाच करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. २०१५ मध्येही अशाच एका प्रकरणात करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी २०२१ दोष सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey trapping of drdo officer in odisha share secret information with pakistan pbs