Honeymoon Tragedy Doctor Couple: चेन्नईच्या डॉक्टर दाम्पत्याचा बालीमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बुडून मृत्यू झाला आहे. या दोघांचाही विवाह नुकताच म्हणजेच १ जून रोजी झाला होता. मात्र स्पीड बोटवर फोटो काढणं त्यांच्या जिवावर बेतलं आहे. या दरम्यानच दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. यामुळे या डॉक्टर दाम्पत्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. पूनमल्ली लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी या दोघांची नावं असल्याचं समोर आलं आहे.

विबुष्णिया आणि पूनमल्ली या दोघांचा विवाह १ जून रोजी झाला. त्यानंतर मधुचंद्रासाठी हे दोघेही बाली या ठिकाणी गेले होते. तिथे वॉटर राईड करत असताना स्पीड बोटवर फोटो काढत होते. त्यावेळी या दोघांचीही तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही माहिती दोघांच्या कुटुंबांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या दोघांचेही कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बाली या ठिकाणी पोहचले आहेत.

Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Husband day care centre
‘बायकांनो, कुठेही जायचं असेल, तर इथे नवऱ्याला सोडा’,आनंद महिंद्रांनी शेअर केला Husband Day Care Centreचा फोटो, काय आहे प्रकरण वाचा
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू

विबुष्णिया ही पोटामल्लीला वास्तव्य करणाऱ्या सेल्वम यांची मुलगी होती. ती डॉक्टर होती. लोकेश्वरन आणि विबुष्णिया या दोघांचं प्रेम होतं. दोघांनीही आपल्या प्रेमाविषयी आपआपल्या घरी सांगितलं दोघांच्या घरुन होकार आला. त्यानंतर या दोघांचं लग्न १ जून रोजी झालं होतं. थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यानंतर हे दोघेही मधुचंद्रासाठी इंडोनेशियाला गेले होते. वॉटर राईड करत असताना पाण्यात पडून दोघांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

बाली येथील समुद्रात या दोघांनीही स्पीड बोट राईड घेतली. स्पीड बोटवर हे दोघे फोटो काढत होते. त्याचवेळी दोघांचाही अचानक तोल गेला. त्यानंतर दोघेही पाण्यात पडले. या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी म्हणजेच ९ जूनला लोकेश्वरनचा मृतदेह सापडला तर शनिवारी सकाळी विबुष्णियाचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Story img Loader