Honeymoon Tragedy Doctor Couple: चेन्नईच्या डॉक्टर दाम्पत्याचा बालीमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बुडून मृत्यू झाला आहे. या दोघांचाही विवाह नुकताच म्हणजेच १ जून रोजी झाला होता. मात्र स्पीड बोटवर फोटो काढणं त्यांच्या जिवावर बेतलं आहे. या दरम्यानच दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. यामुळे या डॉक्टर दाम्पत्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. पूनमल्ली लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी या दोघांची नावं असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विबुष्णिया आणि पूनमल्ली या दोघांचा विवाह १ जून रोजी झाला. त्यानंतर मधुचंद्रासाठी हे दोघेही बाली या ठिकाणी गेले होते. तिथे वॉटर राईड करत असताना स्पीड बोटवर फोटो काढत होते. त्यावेळी या दोघांचीही तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही माहिती दोघांच्या कुटुंबांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या दोघांचेही कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बाली या ठिकाणी पोहचले आहेत.

विबुष्णिया ही पोटामल्लीला वास्तव्य करणाऱ्या सेल्वम यांची मुलगी होती. ती डॉक्टर होती. लोकेश्वरन आणि विबुष्णिया या दोघांचं प्रेम होतं. दोघांनीही आपल्या प्रेमाविषयी आपआपल्या घरी सांगितलं दोघांच्या घरुन होकार आला. त्यानंतर या दोघांचं लग्न १ जून रोजी झालं होतं. थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यानंतर हे दोघेही मधुचंद्रासाठी इंडोनेशियाला गेले होते. वॉटर राईड करत असताना पाण्यात पडून दोघांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

बाली येथील समुद्रात या दोघांनीही स्पीड बोट राईड घेतली. स्पीड बोटवर हे दोघे फोटो काढत होते. त्याचवेळी दोघांचाही अचानक तोल गेला. त्यानंतर दोघेही पाण्यात पडले. या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी म्हणजेच ९ जूनला लोकेश्वरनचा मृतदेह सापडला तर शनिवारी सकाळी विबुष्णियाचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honeymoon tragedy doctor couple from chennai drowns during boat ride in bali scj