अमेरिकेच्या सायबर हेरगिरी कार्यक्रमाचे भांडाफोड करणारा माजी सीआयए कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन हा आज विमानाने हाँगकाँगमधून निघाला असून तो रशियात जाणार असल्याचे समजते, तेथून तो आणखी तिसऱ्याच ठिकाणी जाणार आहे. अमेरिकेने त्याच्यावर अटक वॉरंट काढले होते व त्याला ताब्यात देण्याची मागणी हाँगकाँगकडे केली होती. पंरतु त्याला अटक करण्याची अमेरिकेची मागणी हाँगकाँगने फेटाळली व त्याला दुसरीकडे जाण्याची मुभा दिली आहे. रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्नोडेन हा हवाना मार्गे व्हेनेझुएलाची राजधानी कॅरॅकसला जाणार आहे. काहींच्या मते तो क्युबात आश्रय घेण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने त्यांच्या व परदेशातील नागरिकांवर हेरगिरीचा वापर केला हे सिद्ध करणारे पुरावेच स्नोडेन याने दिले होते. त्यानंतर आता अमेरिका त्याच्यावर संतप्त झाली असून तो अमेरिकेच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी आता हाँगकाँग सोडून दुसरीकडे जात आहे.
हाँगकाँग सरकारच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, स्नोडेन हा स्वखुशीने हाँगकाँग सोडून जात आहे. तो आता तिसऱ्याच कुठल्या ठिकाणी जाणार आहे. त्याचे येथून जाणे हे कायदेशीर व नियमित मार्गाने झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा