हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निदर्शनांचा जोर ओसरला असला तरी अद्यापही काही विद्यार्थी निदर्शक रस्त्यांवर ठाण मांडून बसले असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा मानस आहे.
शहरातील शासकीय मुख्यालयाबाहेरील रस्त्यावरून निदर्शक पांगल्याने शाळा उघडल्या असून नागरी सेवेतील कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. निदर्शने करण्यात येणाऱ्या अन्य दोन ठिकाणांवरूनही निदर्शक आता पांगले असल्याने वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे.
या स्थितीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निदर्शने थांबविण्यात आली आहेत की विद्यार्थ्यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा आखली आहे त्याचा अंदाज येत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.

Story img Loader