हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेंग च्युन यिंग यांनी पदत्याग न केल्यास गुरुवारी मध्यरात्रीपासून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार लोकशाहीवादी नागरिकांनी केला आहे. चीनने मात्र यिंग यांना ठाम समर्थन दिले आहे.
हाँगकाँगमधील निवडणुकांच्या मुद्दय़ावरून लोकशाहीवादी नागरिकांचे आंदोलन चांगलेच चिघळले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यिंग यांनी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पदत्याग करावा, असा इशारा लोकशाहीवादी नागरिकांनी दिला आहे. तसे न झाल्यास आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही नागरिकांनी केला आहे. हाँगकाँगच्या मध्यवर्ती भागात नागरिकांनी प्रचंड संख्येने धरणे धरले असून तेथील सर्व व्यवहार बंद पाडले आहेत.
या आंदोलनामुळे यिंग अडचणीत सापडले असताना चीन मात्र ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ‘पीपल्स डेली’ या चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने यिंग यांचे ठाम समर्थन केले आहे. केंद्र सरकार (चीन सरकार) यिंग यांनी घेतलेल्या निर्णयांमागे ठामपणे उभे असून पोलीस कायद्यानुसार आपले काम करतील, असा गर्भित इशाराही या मुखपत्राने दिला आहे.या वृत्तपत्राने हाँगकाँगमधील लोकशाहीवादी नागरिकांनाही धारेवर धरले आहे. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली न गेल्यास मोठे संकट उद्भवेल, अशी अप्रत्यक्ष धमकी या लेखात देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा