स्वपक्षाला वरचेवर घरचा आहेर देणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी कन्हैया कुमारच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त करताना पुन्हा एकदा पक्षाबाबतची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. कन्हैया तुरूंगातून सुटल्याचा मला आनंद आहे. मात्र, आता कन्हैयाने त्याला चुकीचे ठरविणाऱ्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे सांगत सिन्हा यांनी एकप्रकारे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतके दिवस लोकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचे कन्हैयाने चीज केले पाहिजे, असेही सिन्हा यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपासून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप यांच्यातील दुरावा सातत्याने वाढत आहे.

Story img Loader