स्वपक्षाला वरचेवर घरचा आहेर देणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी कन्हैया कुमारच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त करताना पुन्हा एकदा पक्षाबाबतची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. कन्हैया तुरूंगातून सुटल्याचा मला आनंद आहे. मात्र, आता कन्हैयाने त्याला चुकीचे ठरविणाऱ्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे सांगत सिन्हा यांनी एकप्रकारे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतके दिवस लोकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचे कन्हैयाने चीज केले पाहिजे, असेही सिन्हा यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपासून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप यांच्यातील दुरावा सातत्याने वाढत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा