हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश प्राधिकरणाने जारी केला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकार होते त्यावर आता प्राधिकरणाने बंदी घातली आहे.

ग्राहक तक्रारी कुठे नोंदवू शकतात
सीसीपीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आक्षेप असल्यास, ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवा शुल्क वसूल करण्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ वर तक्रार करू शकतात. तसेच कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सेवा शुल्क इतर कोणत्याही नावाने गोळा केले जाऊ शकते
गेल्या काही दिवसांपासून सेवा शुल्क आकारण्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंटने अन्य कोणत्याही नावाने सेवा शुल्क वसूल करू नये, असे आदेशात म्हटले आहे.

सेवा शुल्क भरण्यास ग्राहक बांधील नाहीत
कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. ग्राहक इच्छित असल्यास सेवा कर देण्यास नकार देऊ शकतो. शिवाय, सेवा शुल्क बिलात जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी लावून वसूल करता येणार नाही. ग्राहक आपल्या तक्रारी पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल करू शकतात.

Story img Loader