लग्न म्हणजे दोन मनं आणि दोन घरं जोडणारा एक संस्कार. लग्नाच्या गाठी या स्वर्गात जोडल्या जातात असंही म्हटलं जातं. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पतीने पत्नीची हत्या ( Husband Kills Wife ) केल्याची घटना घडली आहे. नवीन आणि लिखिता या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर नवीने अवघ्या काही तासांमध्ये लिखिताची म्हणजेच त्याच्या पत्नीची हत्या केली.

नेमकं काय घडलं आणि कुठे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधल्या कोल्हार या ठिकाणी असलेल्या चंबारसाबहाळ्ळी या गावात नवीन आणि लिखिता ( Husband Kills Wife ) यांचा विवाह सोहळा पार पडला. या गावातला लग्नाचा हॉल या दोघांनी सोडला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे दोघंही गेले. त्यांच्याबरोबर इतर नातेवाईकही होते. लिखिताच्या मामाच्या घरी हे दोघं लग्नानंतर गेले. दोघंही तिथे फ्रेश झाले त्यानंतर गप्पा झाल्या आणि खाणंही झालं. हे सगळं झाल्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले. त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं होतं. काही मिनिटांनी त्यांच्या नातेवाईकांना ओरडण्याचा आवाज ( Husband Kills Wife ) आला. ज्यानंतर एका नातेवाईकाने खिडकीतून डोकावून पाहिलं तर नवीन हा लिखितावर चाकूने वार ( Husband Kills Wife ) करत होता.

Success story of kokila who started wooden toy business at the age of 42 know earning lakhs her husband died due to cancer
कर्करोगामुळे पतीचा मृत्यू, तीन मुलांची जबाबदारी अन्…, वयाच्या ४२व्या वर्षी महिलेने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला करतात लाखोंची कमाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून
Wife Killed Husband
Crime News : पतीची हत्या करुन पत्नीने खिशात ठेवले शक्तीवर्धक गोळ्यांचे आठ रॅपर, पोलिसांपुढे रचला बनाव; कुठे घडली घटना?

लिखिताच्या नातेवाईकांनी दार उघडलं आणि..

ही घटना पाहिल्यानंतर लिखिताच्या नातेवाईकांनी खोलीचं दार ठोठावलं आणि ते उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात काही वेळ गेला. त्यानंतर त्यांनी कसाबसा दरवाजा उघडला. आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की लिखिता रक्ताच्या थारोळ्यात ( Husband Kills Wife ) पडली होती. तर नवीनला काही जखमा झाल्या होत्या. कुटुंबियांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र लिखिताला डॉक्टरांनी मृत ( Husband Kills Wife ) घोषित केलं.

हे पण वाचा- Dadar Suitcase Murder : दादर सूटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण, अर्शदच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप

नवीनच्या जबाबानंतर समोर येणार सत्य

नवीनवर पुढील उपचार सुरु आहेत. पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी हे पण सांगितलं की या दोघांमध्ये भांडण कशावरुन झालं त्याचा तपास आम्ही करत आहोत इतकंच नाही तर नवीनला तिथे चाकू कसा मिळाला? याचाही शोध आम्ही घेत आहोत. नवीनचा जबाब नोंदवल्यानंतरच नेमकं भांडण का झालं ते कळू शकेल. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नवीन आणि लिखिता यांचं भांडण का झालं ? त्याचं कारण नवीनच्या कुटुंबाला किंवा लिखिताच्या कुटुंबाला माहीत नाही. नवीन कापड व्यापारी आहे तर लिखिताने नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि या दोघांच्या लग्नानंतर अवघ्या काही तासांत ही धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader