दिल्लीतल्या पालम कॉलनीमध्ये वास्तव्य करणारे सतबीर बरेला यांची मुलगी हर्षिता लंडनमध्ये राहात होती. तिची हत्या झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. हर्षिताला त्यांचं कुटुंब स्विटी म्हणत होतं. हर्षिता अर्थात स्विटी लग्नानंतर लंडनमध्ये राहात होती. मात्र १३ नोव्हेंबरला तिने वडिलांच्या WhatsApp मेसेजला काहीही उत्तर दिलं नाही. अनेक तास तिने मेसेजला उत्तर दिलं नाही त्यामुळे तिचे वडील आणि घरातले लोक चिंतेत पडले. कारण हर्षिता रोज कुटुंबाशी बोलायची. १० नोव्हेंबरला तिने घरातल्यांशी ४० मिनिटं बोलणं केलं होतं. तिने व्हिडीओ कॉल केला आणि सांगितलं की पालक पुरी, बटाट्याची भाजी आणि भजी तयार करते आहे अशी माहिती तिने व्हिडीओ कॉलवर दिली होती. ११ नोव्हेंबरला तिचा फोन लागला नाही. १२ नोव्हेंबरला तिचा पती पंकज लांबा याच्याशीही संपर्क झाला नाही. तर १३ नोव्हेंबरला तिने एका मेसेजला रिप्लाय दिला नाही. WhatsApp Unread Message मुळे काय घडलं जाणून घेऊ.

पोलिसांनी काय सांगितलं?

१३ नोव्हेंबरला हर्षिताने WhatsApp ला काहीही उत्तर दिलं नाही तेव्हा सतबीर यांनी मॅनचेस्टर या ठिकाणी त्यांच्या ओळखीच्या काही लोकांशी संपर्क साधला. १४ नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. यानंतर हर्षिताचा मृतदेह लंडनच्या पूर्व भागात ब्रिसबेन रोड या ठिकाणी एका कारमध्ये आढळून आला. शवविच्छेदन अहवालात हर्षिताचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं समोर आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
Reddy was a second-year student at Kansas State University
बंदूक स्वच्छ करायला घेतली अन् छातीतच लागली गोळी; भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत वाढदिवशी मृत्यू!
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हे पण वाचा-अँटिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण : आरोपी सुनील माने यांना जामीन नाहीच

हर्षिताच्या पतीवर पहिला संशय

पोलिसांनी हर्षिताचा पती पंकज लांबावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज फरार आहे. पंकज आणि हर्षिता यांचं लग्न झालं त्यानंतर हर्षिताकडून चार लाख रुपये घेतले होते. हर्षिताच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की हर्षिता आणि पंकज यांचं वैवाहिक जीवन चांगलं चाललं नव्हतं. हर्षिता घरातून पळून गेली होती त्यावेळी पंकजने तिचा पाठलाग केला होता. ज्यानंतर हर्षिताने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिला काही काळ सुरक्षाही पुरवली होती. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

हर्षिताच्या कुटुंबाने काय आरोप केला आहे?

हर्षिताच्या कुटुंबाने आरोप केला आहे की पंकज आणि त्याचं कुटुंब हर्षिताचा आर्थिक आणि मानसिक छळ करत होतं. सतबीर यांनी म्हटलं आहे की, पंकजच्या कुटुंबाचाही हत्येत सहभाग असू शकतो. त्यांनी आमच्याशी संपर्क WhatsApp केलेला नाही. हर्षिताची बहीण सोनियाने सांगितलं की हर्षिता तिच्या लग्नानंतर नवं आयुष्य सुरु होणार म्हणून खुश होती. तिने ख्रिसमसध्ये येणाऱ्या तिच्या वाढदिवसाची तयारीही सुरु केली होती. आता सगळी स्वप्नं धुळीला मिळाली आहेत.