उत्तर प्रदेशातल्या नोएडा मध्ये राहणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणाऱ्या रेणू सिन्हांची हत्या त्यांच्या पतीनेच केली असा आरोप आहे. या प्रकरणी नितीन सिन्हाने त्याच्या पत्नीला म्हणजेच रेणू सिन्हाला संपवलं. कारण त्याला बंगला विकायचा होता मात्र रेणू त्या विरोधात होती. त्याने पत्नीला ठार केलं आणि पुरावे नष्ट करत होता. मात्र तो फार काळ लपू शकला नाही. बंगल्याच्या स्टोअर रुममध्ये तो होता, त्याला पहाटे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात आता अंत्येष भंडारी नावाच्या माणसाचं नावही पोलिसांसा कळलं आहे. नितीन सिन्हा त्याचा बंगला ५ कोटी ७० लाखांना या अंत्येषला विकणार होता. रविवारी म्हणजेच हत्येच्या दिवशीच ही डील फायनल झाली होती. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास अंत्येष भंडारी हा नितीनचा बंगला ज्या ठिकाणी आहे त्या बंगल्याजवळ आला. सेक्टर ३० चा बंगला क्रमांक डी ४० या ठिकाणी आल्यानंतर नितीनने अंत्येष, त्याचा मुलगा आणि त्यांच्याबरोबर आलेला डिलर या सगळ्यांना बंगला दाखवला. आम्हाला वरचा मजला बघायचा आहे असं अंत्येष म्हणाला. त्यावर नितीनने त्याला सांगितलं की माझी पत्नी कर्करोगग्रस्त आहे आणि ती वर आराम करते आहे. आम्ही आता विदेशातच जाणार आहोत म्हणूनच आम्हाला हा बंगला विकायचा आहे. अंत्येषला पोलिसांनी जी चौकशी केली त्यावेळी अंत्येषने हे सांगितलं की आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा तो खूपच घाबरला होता. मात्र त्याने खून वगैरे केला असेल असा तर आम्हाला संशयही आला नाही. आम्ही पाच कोटी ७० लाख रुपयांमध्ये बंगला घेणार होतो.. पण बरं झालं मी तो बंगला घेतला नाही.

नितीन सिन्हा होता IRS अधिकारी

नितीन सिन्हाने पोलिसांच्या चौकशीत हे सांगितलं की माझ्या पत्नीला म्हणजेच रेणू सिन्हाला कर्करोगाने ग्रासलं होतं. तिच्यावर उपचारही सुरु होते. मात्र आमच्यात बंगला विकण्यावरून वाद होत होते. मी ५ कोटी ७० लाखांना बंगल्याचं डील फायनल केलं होतं पण रेणूला ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच मी तिची हत्या केली अशी कबुलीही नितीनने दिली. तसंच आपण त्यानंतर स्टोअर रूममध्ये लपलो होतो आणि नोकरी करत असताना इंडियन रेव्हेन्यू सर्विस अधिकारी होतो. मी नंतर नोकरी सोडली असंही पोलिसांना त्याने सांगितलं आहे. आता पोलीस नितीनची आणखी चौकशी करत आहेत.

काय आहे हे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी २४ तास आपल्याच बंगल्यात लपून बसलेल्या सिन्हा यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ६१ वर्षीय वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी त्यांच्याच बंगल्याच्या बाथरूममध्ये आढळला होता. त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत होता. त्यामुळेच हे प्रकरण खुनाचं आहे हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. आता या प्रकरणात त्यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रेणू सिन्हा यांच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटना स्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत रेणू यांचा मृतदेह पडल्याचं आढळलं. रेणू सिन्हा यांच्या भावासह कुटुंबाने त्यांच्या पतीनेच ही हत्या केली असावी हा संशय व्यक्त केला होता. रेणू सिन्हा यांचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा त्यांचे पती घरातून बेपत्ता झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रेणू सिन्हा यांच्या पतीला त्यांच्या घरातूनच अटक केली. हत्येनंतर रेणू सिन्हा यांचा पती बंगल्याच्या स्टोअर रूममध्ये लपला होता. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. नितीन सिन्हा असं रेणू सिन्हा यांच्या पतीचं नाव आहे. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How irs officer became murderer of his lawyer wife fighting cancer what happened in kothi number d 40 that day scj
Show comments