केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ( २८ जुलै ) तामिळनाडू येथील रामेश्वरममध्ये ‘एन मन, एन मक्कल’ ( माझी जमीन, माझे लोक ) यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर बोलताना अमित शाह यांनी तामिळनाडू स्टॅलिन सरकारवर हल्लाबोल केला. तामिळनाडूतील घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करण्यासाठी ही यात्रा आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. याला क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनिधी स्टॅलिन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तामिळनाडूमध्ये भाजपा विरुद्ध द्रमूकमध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

हेही वाचा : VIDEO : “तामिळ संस्कृतीला काश्मीर ते कन्याकुमारी पोहचवण्यासाठी ‘एन मन, एन मक्कल’ यात्रा”; अमित शाह यांचं विधान

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “निवडणूक लढत मी आमदार झालो. नंतर मला मंत्रीपदाची संधी देण्यात आली. पण, मला अमित शाह यांना विचारायचे आहे की तुमचा मुलगा बीसीसीआयचा सचिव कसा झाला? त्याने किती क्रिकेटचे सामने खेळले? आणि किती धावा काढल्या?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many runs jay shah scored tamil nadu minister undhayanidhi stalin reply amit shah ssa