Animal fat in Tirupati Laddu Row: तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) येथे प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू सध्या वादात आहेत. आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप केल्यानंतर हा विषय समोर आला. प्रसादासाठी लाडू तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली गेली असल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा वापर केला असल्याचा चाचणी अहवाल समोर आला. या अहवालानंतर भाजपा आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने जोरदार आरोप करत वायएसआर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पण या लाडूमधून मंदिराला किती महसूल मिळतो? लाडूचे अर्थकारण कसे आहे? यावर एक नजर टाकू.

लाडू किती रुपयांना मिळतो?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानकडून दररोज तीन लाख लाडू बनविले जातात. या लाडूच्या विक्रीमधून देवस्थानाला वर्षाकाठी ५०० कोटींचा महसूल मिळतो. देवस्थानात दर्शन घेतल्यावर आणि मंदिराच्या बाहेर अनेक स्टॉल्सवर हे लाडू उपलब्ध असतात. जर व्यवस्थित पॅकिंग केल्यास हे प्रसादाचे लाडू १५ दिवस टिकतात.

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

तिरुपती बालाजी ट्रॅव्हल्सने दिलेल्या माहितीनुसार, तीन आकारमानाच्या प्रकारात लाडू उपलब्ध होतात. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे लाडू मिळतात. त्याचा आकार अनुक्रमे ४० ग्रॅम, १७५ ग्रॅम आणि ७५० ग्रॅम इतका असतो. श्री वेंकटेश्वर मंदिराच्या आतमध्ये छोट्या आकाराचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून मोफत वाटले जातात. तर मध्यम आकाराचे लाडू प्रति नग ५० रुपये आणि मोठ्या आकाराचा लाडू प्रति नग २०० रुपयांना विकला जातो.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या (Tirupati Balaji ) वतीनं भक्तांसाठी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आणि तिरुपती देवस्थानच्या भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली.

हे वाचा >> Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर!

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या (Tirupati Balaji ) वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आरोपामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

वायएसआर काँग्रेसचे प्रत्युत्तर

वायएसआर काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंवर तिरुमला मंदिराचं पावित्र्य घालवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली. तिरुमला प्रसादाबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा प्रकारचे शब्द हे कुणीही बोलणं गैर आहे”, असंही रेड्डी यांनी म्हटलं.

हे ही वाचा >> Tirupati Balaji Prasad Ladoo : तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? ‘पोटू’ नेमकं काय आहे?

प्रयोगशाळेच्या चाचणीत काय आढळलं?

तेलुगु देसम पक्षाने प्रसादाच्या लाडूत कोणते पदार्थ वापरले जातात, याची तपासणी करू प्रयोगशाळेचा एक चाचणी अहवाल समोर आणला आहे. या अहवाात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता, असे अहवालात स्पष्ट केले आहे. हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. तसेच हा रिपोर्ट भारतीय जतना पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी देखील एक्सवर शेअर केला आहे.