महाजालातील सर्वात लोकप्रीय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगलचे संस्थापक सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी कंपनीत फेरबदल करीत नवीन नियुक्त्या केल्या आहेत. तसेच एक मोठा बदल करण्यात आला असून ‘अल्फाबेट इंक’ नावाची नवी कंपनीही स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या अंतर्गत यापुढे गुगल काम करणार असल्याचे समजते. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी त्यांच्या ब्लॉगवरून ही माहिती दिली आहे.
भारतीय वंशाचे ४३ वर्षीय सुंदर पिचई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचई, गेल्या ११ वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत. गुगलचा क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे पिचई यांचा मोलाचा वाटा आहे. २००८ साली पिचई यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने गुगल क्रोम ब्राऊझर महाजालात उपलब्ध करून दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा