NCERT Proposes changes in HSC Result : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालासाठी नवं मूल्यमापन मॉडेल प्रस्तावित केले आहे. त्यानुसार, इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण या निकालात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. तसंच, व्यावसायिक आणि कौशल्य आधारित प्रशिक्षणावर जोर या प्रस्तावाद्वारे देण्यात आला आहे. NCERT ने हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनसीईआरटीने Establishing Equivalence across Education Boards या शीर्षकाखाली अहवाल सादर केला आहे. यामध्ये इयत्ता १० आणि १२ साठी प्रगतीशील मूल्यमापन दृष्टीकोन समाविष्ट असून नवीन फ्रेमवर्क शैक्षणिक वर्ष दोन संज्ञांमध्ये विभागण्यात आला आहे. अहवालाच्या शिफारशींनुसार इयत्ता बारावी बोर्डाच्या निकालांमध्ये आता इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीमधील गुणांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा >> ‘नीट’परीक्षेसाठी ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचायची की नाही?

इयत्ता नववीतील एकूण गुणांपैकी १५ टक्के, इयत्ता दहावीतील २० टक्के आणि इयत्ता अकरावीतील २५ टक्के गुण इयत्ता बारावीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजे इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतच्या एकूण गुणांच्या ६० टक्के गुण बारावीच्या निकालात समाविष्ट होतील. उर्वरित ४० टक्के गुण बारावीच्या गुणांवर दिले जातील. यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रचनात्मक आणि योगात्मक पद्धत

इयत्ता बारावीसाठी मूल्यपामन रचनात्मक आणि योगात्मक पद्धतीने विभगालं जाईल. रचनात्मक मूल्यमापनात आत्म-चिंतन, विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ, शिक्षक मूल्यांकन, इतर स्पर्धांमधील सहभागानुसार गुणांकन केले जाईल. तर योगात्मक मूल्यमापनात परीक्षेतील गुणांचा विचार केला जाणार आहे.

नव्या प्रस्तावानुसार इयत्ता नववीमध्ये ७० टक्के रचनात्मक आणि ३० टक्के योगात्मक विभाजन असेल. तर, इयत्ता दहावीमध्ये समसमान रचनात्मक आणि योगात्मक गुण दिले जातील. तर, इयत्ता अकरावीत ४० टक्के रचनात्मक आणि ६० टक्के योगात्मक गुण दिले जाती तसंच, इयत्ता बारावीमध्ये ३० टक्के रचनात्मक आणि ७० टक्के योगात्मक विभाजन असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc result will the class 12th result now include marks from 9th to 11th what is the new proposal of ncert sgk