न्यूझीलंडमधील टॉपो ज्वालामुखी क्षेत्राच्या भूमिगत खोऱ्यात कोटय़वधी डॉलर्सचे सोन व चांदी सापडण्याची शक्यता आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या लाव्हारसामुळे पाणी तापत असून त्यामुळे हे धातू एकत्र गोळा होत आहेत, पण हे सोने व चांदी मिळवण्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागेल असे त्यांचे मत आहे. मानवी इतिहासातील सोन्याचा सर्वात मोठा साठा तेथे हाती लागणार आहे.
वैज्ञानिकांना अनेक ज्वालामुखींमध्ये यापूर्वीही सोने सापडलेले आहे. ज्वालामुखींचा विचार सोने सापडवण्याच्या दृष्टीने केला गेला नव्हता. लाव्हारसामुळे टॉपो  ज्वालामुखी क्षेत्रातील पाणी तापते व त्यामुळे खोऱ्यात आम्लधर्मी पाणी व खडक विरघळवणारे झरे तयार होतात. न्यूझीलंडमधील उत्तर बेटांवर हा साठा सापडत आहे. सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू पाण्याच्या माध्यमातून काढावे लागणार आहेत. या ज्वालामुखीत १८ मोठे पाण्याचे खोरे सापडले असून ते १.८ मैल खोल आहेत त्यात भरपूर धातू आहेत. तेथे एक विहिर खणली तर २७ लाख डॉलर्सचे सोने वर्षांला मिळणार आहे. रोटोकाला व मोकाई भूऔष्णिक उर्जा केंद्रांजवळ या विहिरी खणल्या तर वर्षांला ८ टन म्हणजे ३६ लाख डॉलर्सची चांदी एका विहिरीतून मिळेल. उटाह विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ स्टुअर्ट सिमॉन्स यांच्या मते पाण्यात असलेले सोने व चांदी १० हजार औंसापेक्षा जास्त आहे. भूऔष्णिक उर्जेची प्रक्रिया न थांबवता हे सोने चांदी बाहेर काढण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे . न्यूझीलंडच्या उत्तर बेटांवर टॉपो नावाचे तळे आहे व तेथे तीन लाख वर्षे सक्रिय असलेला ज्वालामुखी आहे. २६५०० व १८००० वर्षांपूर्वी या ज्वालामुखीचे दोन मोठे उद्रेक झाले होते. २१७ मैलांच्या परिसरात त्याचा विस्तार आहे. १०० मैलांच्या पट्टयाच लाव्हारस सहा मैल खोलीवर आहे . क्लोरिनमुळे तेथील पाण्याचे तपमान ४०० अंश सेल्सियस आहे. त्यामुळे खडक व लाव्हारसातील सोने व चांदी पाण्यात उतरले आहे. सोन्याची संहती २० पीपीबी (पार्टस पर बिलीयन) तर चांदीची संहती २००० पीपीबी  आहे.
* तीन लाख वर्षे जुना ज्वालामुखी- टॉपो
* न्यूझीलंडमधील टॉपी ज्वालामुखीच्या क्षेत्रात हा साठा आहे
* हे धातू वेगळे करण्यासाठी वेगळी पद्धत आवश्यक
* एका विहिरीतून २७ लाख डॉलर्सचे सोने व ३६ लाख डॉलर्सची चांदी मिळणार

Story img Loader