काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला लष्करी जीपसमोर बांधणाऱ्या मेजर गोगोई यांचा सन्मान करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता लष्कराकडून नवे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य काश्मिरी नागरिकांची ‘मानवी ढाल’ बनवण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, असे आदेश लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या जवानांनी स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांच्यासोबतचे संबंध सुधारावेत, अशा सूचना लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीला ‘मानवी ढाल’ बनवण्याऐवजी सर्वच काश्मिरींशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत, असे प्रयत्न लष्कराकडून करण्यात येत आहेत. ‘स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा आदेश काश्मीरमध्ये सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बडगाममध्ये दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी मेजर गोगोई यांनी एका स्थानिकाला जीपसमोर बांधल्यानंतर लष्कराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यामुळेच आता स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

‘मेजर गोगोई यांची कृती मला व्यक्तीश: चुकीची वाटते. मात्र ज्यावेळी ती घटना घडली, त्यावेळी मी तिथे नव्हतो. त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल आणि त्यावेळी मेजर गोगोई यांच्या मनात काय चालले होते, याची कल्पना मी करु शकत नाही. मेजर गोगोई यांनी केलेल्या कृतीचे लष्करप्रमुखांनी कौतुक केले आहे. मात्र असे असले तरी अशा प्रकारची कृती पुढे केली जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मानवी ढाल वापरण्याची कृती करण्याऐवजी स्थानिकांशी संबंध सुधारावेत, असे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती काश्मीरमध्ये सेवा बजावलेल्या एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध राखण्याच्या अटीवर दिली आहे.

काश्मीरमध्ये कर्तव्यावर आणखी एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याने, ‘जवान और अवाम, अमन है मुकाम’, असे म्हणत स्थानिकांसोबत संवाद साधण्याचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘स्थानिकांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशा सूचना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. मेजर गोगोई यांनी केलेल्या कृतीचा सन्मान करण्यात आला असला, तरी असे पुन्हा घडण्याची वेळ येऊ नये, असे आदेश ‘वरुन’ देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

लष्कराचे जनसंपर्क अधिकारी मनिष आनंद यांनी मात्र असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे सांगितले. ‘भारतीय लष्कराकडून असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी स्थानिकाला जीपला बांधले होते. मेजर गोगोई यांनी परिस्थितीनुसार तो निर्णय घेतला होता. मेजर गोगोई यांची कृती लष्करी जवानांच्या सवयीचा भाग होणार नाही. मेजर गोगोई यांची कृती अपवादात्मक होती,’ आनंद यांनी सांगितले.