पीटीआय, नवी दिल्ली

मायक्रोसॉफ्टने आपल्या सायबर सुरक्षा भागीदार ‘क्राऊडस्ट्राइक’मुळे झालेल्या बिघाडानंतर सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी शेकडो अभियंते आणि तज्ज्ञांची फौज तैनात केली असल्याचे ‘ब्लॉग’वर म्हटले आहे. १८ जुलै रोजी क्राऊडस्ट्राइकच्या अद्यायावतीकरणातील घोळामुळे जगभरातील ८.५ दशलक्ष उपकरणांवर परिणाम झाला. जगभरातील छोटे उद्याोजक तसेच विमान कंपन्यांपासून रुग्णालयांपर्यंत सर्वच जण यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी झगडत आहेत.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई

जागतिक ‘तंत्रकल्लोळा’मुळे भारतीय विमान वाहतूक आणि इतर विक्री उत्पादनांच्या सेवेवर मोठा परिणाम झाला. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, संपूर्ण उद्याोगात बिघाडाचा काय परिणाम होत आहे, याबद्दल माहिती घेण्यासाठी तसेच क्राऊडस्ट्राईक आणि ग्राहकांबरोबर सुरू असलेल्या संभाषणाची माहिती देण्यासाठी ते गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्म (जीसीपी) आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) तसेच इतर भागधारकांबरोबर सहयोग करत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अनेक व्यवसाय आणि व्यक्तींच्या दैनंदिन व्यवहारात आलेल्या व्यत्ययाची आम्हाला कल्पना आहे. ग्राहकांची विस्कळीत झालेली यंत्रणा सुरक्षितपणे पूर्वपदावर आणण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करणे आमचे उद्दिष्ट असल्याचे मायक्रोसॉफ्टने ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही घटना जागतिक ‘क्लाउड’ प्रदाते, सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, सुरक्षा आणि इतर सॉफ्टवेअर विक्रेते आणि ग्राहकांचा समावेश असलेल्या विस्तृत तंत्रज्ञान व्यवस्थेचे परस्परसंबंधित स्वरूप दर्शवते.

Story img Loader