पीडितांना न्याय देण्याचं काम देशाच्या न्यायव्यवस्थेमार्फत सातत्याने केलं जातं. मात्र, अनेकदा न्यायालयांमध्ये काही वेगळी प्रकरणंही सुनावणीसाठी येतात. ही प्रकरणं त्यातल्या गुन्ह्यामुळे नसून आरोपी किंवा फिर्यादींच्या दाव्यांमुळे जास्त चर्चेत येतात. असंच एक प्रकरण सध्या गुजरात उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलं असून त्यात चक्क एका पतीनं पत्नी आपल्याला फक्त वीकएंड्सला म्हणजेच शनिवार-रविवार वेळ देते, असं म्हणत न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे पत्नीनंही पतीच्या या याचिकेविरोधात वेगळी याचिका दाखल केली असून ही याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे! फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

सूरतमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात हिंदू विवाह कायदा कलम ९ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार पतीनं पत्नीला आपल्यासोबतच राहण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी केली आहे. बाळंतपण झाल्यानंतर कामाचं कारण देऊन पत्नी तिच्या माहेरीच तिच्या पालकांसमवेत राहत असून हे पती म्हणून आपल्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा पतीनं याचिकेत केला आहे. दरम्यान, एकीकडे पतीनं आपल्या अधिकारांचा आधार घेत याचिका दाखल केली असताना पत्नीनं त्याच अधिकारांचा दाखला देत ही याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.

पत्नी म्हणते, “मी सर्व कर्तव्य पार पाडते”

पतीनं केलेला दावा फेटाळताना पत्नीनं आपण सर्व कर्तव्य पार पाडत असल्याचा दावा केला आहे. “मी एक पत्नी म्हणून माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. माझ्या पतीच्या घरी मी आठवड्यातून दोनदा जाते. त्यामुळे या याचिकेला कोणताही आधार नसून ती फेटाळण्यात यावी”, अशी मागणी पत्नीने केली आहे.

“गोळ्या झाडल्या, डोळे काढले अन् गुप्तांग…”, २२ वर्षीय धर्मगुरूच्या खुनानं एकच खळबळ

“पतीला पत्नीविरोधात दाद मागण्याचा अधिकार नाही?”

दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणात पतीला सविस्तर भूमिका मांडण्यासाठी २५ जानेवारीची तारीख दिली आहे न्यायमूर्ती व्ही. डी. नानावटी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. पत्नीनं आपल्यासोबत राहावं, अशी मागणी करण्यात पतीचं काय चुकीचं आहे? असा प्रश्न करतानाच पतीला अशा स्थितीत पत्नीविरोधात याचिका करण्याचा अधिकार नाही का? अशी विचारणाही न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांना केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होईल.