Viral Video : सुरक्षा रक्षकाने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराबरोबर कारमध्ये रंगेहाथ पकडल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात समोर आला. त्यानंतर या घटनेत पत्नी आणि तिच्या प्रियकराला जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झाला. ज्यामध्ये तो व्यक्ती कारच्या बोनेटवर चढल्याने थोडक्यात बचावला. पुढे तो कारच्या बोनेटवर असतानाच त्याच्यासह कार ८० चे ९० किलोमीटर प्रतितास वेगाने जवळपास एक किलोमीटर पळवत घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकारही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर काही मोठी दुर्घटना होण्याआधी दुसर्‍या एका वाहनाने अडवे येत ही कार थांबवण्यास भाग पाडले. मोरादाबाद आग्रा राज्य महामार्गावर हा प्रकार घडला. कार थांबल्यानंतर सुरक्षा रक्षकाने खाली उडी मारत कारचा दरवाजा उघडला आणि पत्नीच्या प्रियकराला ओढून बाहेर काढले. रस्त्याच्या मधोमध सुमारे ३० मिनिटे हा गोंधळ सुरू होता, यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

त्यानंतर कारचालक आरोपी नजरुल हसन (३२) याच्याविरोधात सुरक्षा रक्षकाने काटघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आगे. नजरूल हा मोहम्मद समीर (३१) याची पत्नी नूर अफशा (२९) हिच्यासोबत कारमध्ये होता.

समीर कारच्या बॉनेटला पकडून बसलेला आणि कार सुमारे ८० ते ९० किमी प्रतितास वेगाने जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समीर हा काटघर येथील रहिवासी असून तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. समीरने आपल्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, त्याची शिक्षिका असलेल्या पत्नीचे बिलारी येथील टॅक्सी चालक हसनसोबत प्रेमसंबंध आहेत.

“प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ बुधवारी संध्याकाळी मला माझी पत्नी हसनबरोबर कारमध्ये दिसली. जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा हसनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी कारच्या पुढे जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी गाडीच्या बोनेटवर अडकलो.”

मुरादाबाद शहराचे एसपी रणविजय सिंह यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “आफशा आणि हसनचे नऊ वर्षांपूर्वी समीरशी लग्न होण्याआधी नातेसंबंध होते. लग्नानंतर तिच्या आणि समीर वाद होऊ लागले आणि त्यामुळे ते गेल्या सात वर्षांपासून वेगळे राहत आहेत”.

दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी बीएनएस कलम २८१, १२५, आणि ११५(२) याबरोबरच ३५२ या अंतर्गत हसनविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband hangs on bonnet as his wife sits in car with lover in utter pradesh rak