बिहारमधील जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चंद्रदीप पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इस्लामनगर परिसरात पती-पत्नीच्या भांडणाचा करुण अंत झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र कुमार (२८) याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. जितेंद्रने दोन्ही कुटुंबियांची समजूत घालून त्यांच्या लग्नाला परवानगी मिळवली आणि दोघांनीही लग्न केले. या दाम्पत्याला चार महिन्यांचे चिमुकले बाळ आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्नीने जितेंद्रशी भांडण करून घर सोडले होते. जितेंद्रने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. अखेर पत्नीला व्हिडिओ कॉल करून बोलत असताना जितेंद्रने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे वाचा >> “हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांना जाळलं आणि महिलांवर…”, बेंजामिन नेतान्याहूंच्या पत्नीचं पोप फ्रान्सिस यांना पत्र

या प्रकाराळामुळे जितेंद्रच्या आईला मोठा धक्का बसला आहे. चंद्रदीप पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी मोहम्मद अब्दुल हलीम यांनी सांगितले की, जितेंद्रच्या पत्नीने त्याचे घर सोडून माहेरी जाणे पसंत केले होते. मागच्या काही दिवसांपासून तिला परत आणण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र पत्नीने आपला मोबाईल स्विच ऑफ करून जितेंद्रशी भेटण्यास नकार दिला.

शनिवारी मध्यरात्री जितेंद्रने पत्नीला व्हिडिओ कॉल करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने जितेंद्रचे काही एक ऐकले नाही. दोघांचेही भांडण सुरू असताना जितेंद्रने गावठी पिस्तुलाने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज येताच जितेंद्रच्या कुटुंबियांनी धाव घेतली आणि रक्तबंबाळ झालेल्या जितेंद्रला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.