उत्तर प्रदेशात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीनं पत्नीवर चाकूनं १९ वेळा हल्ला केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही व्हिडीओत कैद झाला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तर, जखमी महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लखनऊमध्ये ही घटना घडली आहे. ब्रिजमोहन निषाद असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. सुमन असं जखमी महिलेचं नाव आहे. सुमन कुतुबपूर भागातील लांबकेश्वर पार्कजवळ भाजी विकत घेत होत्या. तेवढ्यात ब्रिजमोहन तिथे आला आणि त्यानं सुमनवर कात्रीने हल्ला केला. काही सेकंदात ब्रिजमोहनने सुमनवर १९ वेळा कात्रीने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनामुळे एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सुमन खाली कोसळल्या. ही माहिती मिळाल्यानंतर सुमन यांचा मुलगा राहुलने पोलीस ठाणे गाठून वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राहुलने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ब्रिजमोहनविरुद्ध कलम ३२४, ३४२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ब्रिजमोहनला पोलिसांनी अटक केली आहे. सुमनवर केजीएमयू रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. पण, सुमनच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजमोनहला सुनमचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडण व्हायची. याआधीही ब्रिजमोहनने सुमनवर हल्ला केल्याचं राहुलने सांगितलं. याप्रकरणी डिसेंबरमध्ये ब्रिजमोहन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘फ्री प्रेस जर्नल’नं हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader