हैदराबादमधील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ याला हैदराबादमधील न्यायालयाने सोमवारी १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याचवर्षी २१ फेब्रुवारीला हैदराबाद शहरातील दिलसुखनगर भागात दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. भटकळ आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हे स्फोट घडवून आणले होते. गेल्याच महिन्यात भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना बिहारमधील नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली.
एनआयएच्या अधिकाऱय़ांनी हैदराबादमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात भटकळला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सोमवारी हजर केले. न्यायालयाने त्याला त्याचे नाव आणि गाव याबद्दल विचारले. त्यावर नाव यासिन भटकळ आणि गाव भटकळ असे उत्तर यासिनने न्यायालयात दिले.
२१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील न्यायालयाने भटकळला हैदराबादमध्ये नेण्यासाठी दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा