Hydrabad Crime News : मुलाने २० वर्षांपूर्वी मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरत एक जोडप्याने आपल्याच सुनेची हत्या करून तिला शेताच पुरल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. ४० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना पोलिसांनी हे धक्कादायक प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणातील मृत महिलेने आरोपींच्या मुलाशी २० वर्षांपूर्वी लग्न केले होते. याचाच राग मनात धरून आरोपींनी सुनेची हत्या केल्याचे शमशाबाद पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान मृत महिलेचा पती एम सुरेश यांनी शमशाबाद पोलिसांकडे नोव्हेंबरमध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
पोलिशी खाक्या दाखवताच…
पोलिसांनी अनेक प्रयत्न करुनही मृत महिलेचा शोध लागत नव्हता. त्यानंतर पती सुरेश यांनी आई तुलसी आणि वडील अनंती यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातील त्यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले होते. पण पोलिसांनाही त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी आरोपींना पोलिशी खाक्या दाखवताच त्यांनी सुनेची दोन महिन्यांपूर्वी हत्या केल्याची कबुली दिली.
सुनेची हत्या करण्यापूर्वी सासू तुलसीने पीडितेला फोन करून भेटायला बोलावले होते. सून भेटायला आली तेव्हा सासू तुलसीने तिला ताडी प्यायला दिली, ज्यामध्ये विष मिसळले होते. ताडी प्यायल्यानंतर सून बेशुद्ध होताच तुलसीने पती अनंतीला बोलावत सुनेला दगडाने ठेचून मारले.
विष मिसळलेली ताडी अन्…
हत्येपूर्वी, तुलसीने पीडितेला फोन करून भेटण्यास सांगितले. पीडिता सथमराई येथे आली तेव्हा तुलसीने तिला विष मिसळलेली ताडी दिले. त्यानंतर तिने अनंतीला बोलावले आणि दोघांनीही तिच्यावर दगडाने हल्ला केला. सुनेच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी ते ज्या शेतात काम करायचे तिथे मृतदेह पुरला. चौकशी दरम्यान आरोपींनी याबाबत कबुली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह खोदून काढत ताब्यात घेतला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
सुरेश यांनी २० वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात सुनेबद्दल राग होता. दरम्यान मृत महिला आणि सुरेश यांना दोन मुले आहेत. यातील एका मुलाने आईला आजीशी बोलताना पाहिल्याचे सांगितल्यानंतर सुरेश यांना पत्नी बेपत्ता होण्यामागे आई-वडिलांचा हात असावा अशी शंका आली होती.