लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आला. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शुक्रवारी रात्री पीडित महिला रस्त्याच्या कडेला उभी असताना, आरोपीने तिला आपल्या गाडीमध्ये लिफ्ट दिली. पीडित महिलेला तिच्या गावी जायचे होते. गाडीसाठी म्हणून ती थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिला गाडीमध्ये लिफ्ट दिली.

महिलेला इच्छित स्थळी सोडण्याऐवजी, आरोपी निर्जन स्थळी गाडी घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला ज्या गावामध्ये राहते, आरोपी सुद्धा त्याच गावचा आहे. महिलेने शनिवारी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Story img Loader