हैदराबादच्या ३६ वर्षीय महिलेली हत्या ऑस्ट्रेलियात करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकण्यात आला. या घटनेत महिलेच्या पतीनेच ही हत्या केली असावी असा संशय आहे. चैतन्य मधागनीने त्याची पत्नी श्वेताची हत्या केली, तिचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकला आणि आपल्या मुलाला आपल्या आई वडिलांकडे सोपवलं त्यानंतर तो भारतात परतला. श्वेता तिच्या पतीसह आणि मुलासह ऑस्ट्रेलियात वास्तव्य करत होती.
बंडारी लक्ष्मा रेड्डी काय म्हणाले?
उप्पल म्हणजेच पूर्व हैदराबादचे आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांच्या मतदारसंघातली ही महिला होती. त्यांनी या घटनेची माहिती मिळताच श्वेता या महिलेच्या आई वडिलांची भेट घेतली. बंडारी लक्ष्मा रेड्डींनी पीटीआयला सांगितलं की या महिलेचा मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयाला अर्ज केला आहे. तिच्या आई वडिलांनी ही मागणी केली त्यानंतर मी हे पत्र लिहिलं आहे असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियात आढळला मृतदेह
बंडारी रेड्डी असंही म्हणाले की महिलेच्या माता-पित्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जावयाने मुलीची हत्या केल्याची बाब कबूल केली आहे. दुसरीकडे ९ मार्चला ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांनी असं म्हटलं आहे की होमिसाइड स्क्वाडचे गुप्तहेर विनचेल्सी यांना एक मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर तिची ओळख पटवली. टाइम्स नाऊने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.