हैदराबादमध्ये एका २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादनगर परिसरामध्ये या तरुणीची स्कुटी पंक्चर झाली होती. त्यानंतर या तरुणीने तिच्या बहिणीला फोन केला. “रात्री सव्वा नऊच्या सुमारास तिने मला फोन करुन स्कुटी पंक्चर झाल्याचे सांगितले. तसेच एका व्यक्तीने तिला जवळच्या गॅरेजपर्यंत लिफ्ट देतो असंही सांगितल्याचंही तिने फोनवरील संभाषणादरम्यान सांगितलं,” अशी माहिती तरुणीच्या बहिणीने पोलिसांना दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी या तरुणीची गाडी बंद पडली ते ठिकाण निर्जन होते. या तरुणीने बहिणीशी बोलताना आपल्याला येथे भिती वाटत असून इथे अनेक अनोखळी पुरुष असून मोठ्या प्रमाणात ट्रकही उभे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी बहिणीने तिला गाडी तिथेच सोडून जवळच्या टोलनाक्यापर्यंत चालत जाण्यास सांगितले. “आमचे बोलणे झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तिला फोन केला तर तिचा फोन स्वीच ऑफ होता,” असंही या तरुणीच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटलं आहे.
पोलिसांना गुरुवारी सकाळी या तरुणीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत अढळला. एका स्थानिकाने फोन करुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या बहिणीने पोलिसांकडे केली असल्याने तिला सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बोलवले. त्यावेळी गळ्यातील लॉकेटवरुन बहिणीने मृतदेह ओळखला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घटनास्थळापासून काही अंतरावर या तरुणीची अंतर्वस्र सापडल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्याचा केल्याचा संक्षय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नक्की किती हल्लेखोर होते यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला असून चौकशीसाठी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासून पाहत आहेत. या तरुणीला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याचा संक्षय शादनगरचे पोलिस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. या तरुणीची स्कुटी पोलिसांना सापडलेली नाही. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत.