हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अझिथ्रोमायसिन या दोन औषधांचा वापर करोना रुग्णांवर करण्यात येत असला तरी ही दोन्ही औषधे घातक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. या दोन्ही औषधांचा हृदयावर विपरीत परिणाम होत असतो असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आताच्या काळात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे घातक परिणाम लक्षात घेऊन या औषधाच्या करोना रुग्णांवरच्या चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस घेब्रेसस यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हँडरबिल्ट विद्यापीठ व स्टॅनफर्ड विद्यापीठ या अमेरिकेतील दोन संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या माहितीचा वापर करून असे म्हटले आहे,की १३० देशातील २.१० कोटी लोकांना १४ नोव्हेंबर १९६७ ते १ मार्च २०२० दरम्यान जी औषधे देण्यात आली त्यांचा अभ्यास केला असता हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधांमुळे हृदयावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. करोनाच्या आधीपासून ही औषधे वापरात आहेत. पण आता ती करोनावरील उपचारात समाविष्ट करण्यात आली आहेत. अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाने हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे दिसून आले आहे. २.१ कोटी लोकांपैकी ७६८२२ लोकांमध्ये या काळात वाईट परिणाम झाले होते.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विनने २१८०८ म्हणजे २८.४ टक्के लोकांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले. अ‍ॅझिथ्रोमायसिनमुळे ८९६९२ रुग्णात वाईट परिणाम दिसून आले , हे प्रमाण ६०.८ टक्के आहे. ६०७ रुग्णात दोन्ही औषधांच्या एकत्रित वापराचे दुष्परिणाम दिसून आले .

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hydroxychloroquine azithromycin harmful abn