होय मी हिंदू आहे, मी गोमांस खाल्ले आणि यापुढेही खात राहणार असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीस मार्कंडेय काटजू यांनी केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना आव्हान दिले आहे. गोमांस खाल्ल्याशिवाय राहवत नसणाऱयांनी पाकिस्तानात जा, असे विधान मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. नक्वी यांच्या या विधानाचा समाचार घेणारी पोस्ट काटजू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केली आहे. जगातील ९० टक्के लोक गोमांस खातात मग ते पापी आहेत का? असा सवाल देखील काटजू यावेळी उपस्थित केला. गाय पवित्र आहे अथवा आपली माता आहे, हे मी मानत नाही. एक जनावर मनुष्याची आई कशी होऊ शकते. यामुळेच ९० टक्के भारतीय नागरिक मुर्ख असून, यामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचाही समावेश आहे, असेही विधान काटजू यांनी फेसबुकवर केले आहे.
गोमांस खाल्ल्याशिवाय राहवत नसेल तर पाकिस्तानात जा- मुख्तार अब्बास नक्वी
दरम्यान, सरकार अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यात सरकारविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी काय करत आहे, या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान नक्वी यांनी शुक्रवारी भारतातील ज्या लोकांना गोमांस खाल्ल्याशिवाय राहवत नसेल त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान करून वाद ओढावून घेतला. समाजातील विशिष्ट समुहाला गोमांस खाल्ल्याशिवाय किंवा त्याची विक्री केल्याशिवाय राहवतच नसेल तर हा देश त्यांच्यासाठी नाही. त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानमध्ये किंवा अरब देशांमध्ये जावे, असे नक्वी यांच्याकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा