उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलेबाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सत्संग झाल्यानंतर जेव्हा भोलेबाबा निघाले तेव्हा चेंगराचेंगरी झाली. १२१ भाविकांचा यात मृत्यू झाला. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर व इतरांची नावे यामध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ जुलैच्या दिवशी नेमकं काय घडलं?

२ जुलैच्या दिवशी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोलेबाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले, या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला.” ही माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे पण वाचा- हाथरस चेंगराचेंगरी; राहुल गांधींनी पीडित कुटुंबीयांची घेतली भेट | Rahul Gandhi | Hathras

भोलेबाबांनी आता काय म्हटलं आहे?

“२ जुलैला जी घटना घडली त्यानंतर मी खूप व्यथित झालो आहे. देव आम्हाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देओ, आम्हाला प्रशासन आणि शासनावर विश्वास आहे. जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा होईल, कुणालाही सरकार सोडणार नाही. आमचे वकील डॉक्टर ए.पी. सिंग यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत. तसंच सगळ्या महापुरुषांना मी विनंती केली आहे की या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना आपल्याला साथ द्यायची आहे. सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे. माझी विनंती सगळ्यांनीच मान्य केली आहे. देव सगळ्यांना सद्बुद्धी देईल. जी घटना घडली त्याचं मला अतीव दुःख झालं आहे. माझ्या संवेदना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसह कायम आहेत, तसंच जे जखमी झाले त्यांनाही आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.”

चेंगराचेंगरीच्या आधी काय घडलं?

“भोलेबाबा हे स्टेजवरच्या आसनावर बसून बोलत होते. त्यांना पाहण्यासाठी काही महिला खांबावर चढल्या होत्या. महिला, पुरुष आणि लहान मुलं मांडवात उभे राहिले होते आणि भोले बाबांचा जयजयकार करत होते. भोलेबाबांना पाहण्यासाठी ही सगळी गर्दी झाली. याच सगळ्या गडबडीनंतर चेंगराचेंगरीची घटना घडली.” प्रमाणापेक्षा जास्त लोक आल्याने ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईंना मदत जाहीर करण्यात आली आहे.एका महिलेने ही माहिती दिली

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am deeply saddened after the incident of july 2 may god give us the strength to bear this pain said bholebaba scj
Show comments