भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. जिनपिंग उपस्थित राहणार नसल्याने राष्ट्राध्यक्ष बायडेन निराश झाले आहेत. अमेरिकेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.

भारत आणि व्हिएतनाम देशांच्या दौऱ्यासाठी उत्सुक आहात का? असं विचारलं असता बायडेन म्हणाले, “होय, मी उत्सुक आहे.” दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या वृत्तावर भाष्य करताना बायडेन म्हणाले, “मी निराश झालो आहे. पण मी त्यांना लवकरच भेटणार आहे.”

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

या वर्षाच्या अखेरीस सॅन फ्रान्सिस्को येथे आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन फोरमची परिषद होणार आहे. या परिषदेत बायडेन आणि जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन ७ सप्टेंबरला (गुरुवारी) भारतात येणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी शिखर परिषदेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.

हेही वाचा- ‘एक देश-एक निवडणूक’ वाद: ‘संघराज्य व्यवस्थेसह राज्यांवरही हल्ला’

राजधानी दिल्लीत पार पडणाऱ्या जी-२० शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-द-सिल्वा आदि नेते उपस्थित राहणार आहेत. तथापि, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची लेखी पुष्टी अद्याप झाली नाही.

Story img Loader